Chandrapur : जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे 26 मे रोजी संबंधित कलमान्वये जबरी चोरी(Robbery)चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूर आणि गोंडपिपरी पोलीस स्टेशन,यांचे पथक संयुक्तपणे करत होते.दरम्यान तपास सुरू असताना,पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे रा.राजुरा,जि.चंद्रपूर,याने सदरचा गुन्हा केल्याची गुप्त माहिती LCB पथकाला मिळाली.या माहितीवरून पथकाने सापळा रचून तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले.तांत्रिक विश्लेषण(Technical Analysis)च्या आधारे कसून विचारपूस केली असता,त्याने गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावानजीक सदर चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीकडून चोरीचे 2 मोबाईल किअं. 30 हजार, गुन्ह्यात वापरलेली एक एक्टिवा दुचाकी किअं. 60 हजार,असा एकूण 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात,सपोनि.ठाणेदार गोंडपिपरी रमेश हत्तीगोटे, पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.मंगेश कराडे,सफौ.धनराज करकाडे,पोहवा.सुरेंद्र महंतो,रजनीकांत पुट्टावार,चेतन गज्जलवार,विलास कोवे,पोअं.प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे,सुशील गोंगले,आकाश गुंजकर,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर,गोंडपिपरी पोलीस स्टेशन व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.#Robbery Case.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
