Chandrapur : नागपूर ते चंद्रपूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.एम.डी(मेफेड्रोन) ड्रग्स पावडरच्या तस्करीविरोधात पोलिसांनी सध्या मोठी मोहीम उघडली असून,8 मे रोजी LCB पथक वरोरा परिसरात गस्तीवर असताना पथकाला माहिती मिळाली की,नागपूरवरून एक इसम मोठ्याप्रमाणात 'एमडी ड्रग्ज' विक्री करण्यासाठी चंद्रपूर येथे येणार आहे.या माहितीची गांभीर्याने दखल घेत पथकाने वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील खंबाळा शिवारात सापळा रचून विरूद्ध दिशेने संशयास्पदरित्या मोपेडवरून आलेल्या इसमाला थांबवून, पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता,त्याच्याकडे 101ग्रॅम एमडी(MD)ड्रग्ज पावडर मिळून आली.अमित कृष्णा गजभिये वयवर्ष 23,रा.इंदोरा नागपूर,याला अटक करण्यात आली असून त्याचे दोन साथीदार हर्षल टेंभेकर रा.इंदोरा नागपूर,सोहेल शेख (सोहेल SK)रा.चंद्रपूर,यांचा शोध सुरू आहे.
सदर आरोपीने हा माल नागपूर व चंद्रपूर,येथील त्या दोन साथीदारांच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.एमडी(MD)ड्रग्ज पावडर एकूण वजन 101 ग्रॅम,कि.अं. 5 लाख,एक मोबाईल फोन कि.अं.10 हजार,एक मोपेड मोटारसायकल क्र.MH/31/FH/2049 कि.अं.80 हजार,असा एकूण 5 लाख,90 हजारांचा मुद्देमाल जप्त करून वरोरा पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोर यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,सुनील गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार,दिपक डोंगरे,इम्रान खान,पोअं.हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे,शशांक बदामवार(LCB चंद्रपूर),पोहवा. कार्तिक खनके,पो.अं.अनिमेश भोंगळे व चंद्रपूर सायबर पोलीसांनी केली आहे.
#Chandrspur District Crime News.#MD Drugs Smuggling in Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
