Historic Achievement of Chandrapur Police; Action Against Cattle : Smugglers Under MCOCA !|Marathi News.

News@MCOCA...

        Chandrapur : जिल्ह्यात संघटीतपणे अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी व ऐतिहासिक पाऊले उचलली आहे.जिल्ह्यातील कुख्यात गोवंश तस्कर 'इम्रान बब्बु शेख आणि त्याच्या टोळी विरुद्ध अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 मकोका (MCOCA)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर 'मकोका' लावण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच धडक कारवाई ठरली आहे. Action Against Cattle Smugglers Under MCOCA.

                       'घटनेची पार्श्वभूमी व पोलीस कारवाई'

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक 6 एप्रिल रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या ह‌द्दीत अवैध जनावरांची वाहतूक,दारूबंदी (प्रोव्हीशन)जुगार रेड,तसेच चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमधील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यासाठी गस्तीवर होते.या दरम्यान, LCB पथकाला माहिती मिळाली की,मूल ते चंद्रपूर रोडवरून तेलंगणा राज्याकडे 2 मोठ्या ट्रकमध्ये गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे.मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून टाटा कंपनीचे 2 संशयित ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात 63 जनावर मिळून आले.त्यातील 2 जनावरे जागीच मरण पावलेल्या स्थितीत आढळली.आरोपींकडे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे वाहतूक प्रमाणपत्र किंवा आरटीओ(RTO)चा जनावरे वाहतूक परवाना, अशी कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती.

                                 'तपासात निष्पन्न झाले.'

             तपासात निष्पन्न झाले की,आरोपींनी संगनमत करून या गोवंशाची कत्तल करण्याच्या उ‌द्देशाने महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात अवैध चोरटी वाहतूक चालविली होती.या गुन्ह्यासाठी इतर पाहिजे असलेल्या आरोपींनी अपप्रेरणा दिली होती.

        ‌‌                        'दाखल गुन्हे आणि तपास'

      सदर प्रकरणी फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून रामनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं.441/2026 अन्वये  खालील कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला.प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 : कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज),महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976(सुधारित 2015):कलम 5(अ),5(ब), 9,भारतीय न्यायिक संहिता(BNS): कलम 325,3(5),49,या गुन्ह्याचा प्राथमिक तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे यांनी केला.

                     'जिल्ह्यातील पहिलीच माकोका कारवाई.'

             टोळी प्रमुख इम्रान बब्बु शेख व त्याचे साथीदार,हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून चंद्रपूर जिल्ह्यात या टोळीविरुद्ध संघटीतपणे अवैध गोवंश तस्करीचे एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.या टोळीने वैयक्तिक आणि टोळीच्या माध्यमातून सातत्याने संघटीत गुन्हेगारी केल्याचे निष्पन्न झाले असून,माननीय न्यायालयानेही याची दखल घेतली आहे.ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने तात्काळ 'मकोका' कारवाईचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर,यांच्याकडे सादर केला होता.या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत,विशेष पोलीस महानिरीक्षकांनी 25 मे रोजी कलम 23(1)(अ)अन्वये,या ऐतिहासिक प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली.त्यानुसार या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1)(ii),3(2),3(4)'ही कडक वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. गोवंश तस्करांवर मकोका लावण्याची ही चंद्रपूर पोलीस दलाच्या इतिहासातील पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

                             'कारवाई करणारे पोलीस पथक'

  सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी(चंद्रपूर)प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

            ‌           'या कारवाईतील अधिकारी व अंमलदार.'

    LCB पोलीस निरीक्षक अमोल काचोरे चंद्रपूर.रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके.रामनगर पोलीस स्टेशन तपास अधिकारी पोउपनि.सुरेंद्र उपरे.सफो.अरुण खारकर,पोहवा. परवरीश शेख,पो.हवा.सुधीर मत्ते LCB चंद्रपूर,पोकॉ.अनिल जमकादम रामनगर पोलीस स्टेशन.

    ‌                       'पोलीस प्रशासनाचा कडक इशारा.'

चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अवैध गोवंश तस्करी किंवा संघटीत गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही.अशा गुन्हेगारांवर यापुढेही मकोका सारख्या अत्यंत कठोर कायद्यांतर्गत अशीच मोहीम सुरु राहील.असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

#Historic Achievement of Chandrapur Police.#Action Against Cattle Smugglers Under MCOCA.

                          $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$