Ganja Smugling : गांजा तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद!| Marathi News.

News@Crime...

           Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा(LCB)ने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठ्याप्रमाणात कारवाई सुरू केली आहेत.याच श्रेणीत ओडिशा राज्यातून गांजा आणून विक्री करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला LCB पथकाने जेरबंद केले आहेत.या कारवाईत 3महिला, 2 पुरुषांचा समावेश असून,त्यांच्याकडून 11 किलो गांजा,ऑटो आणि मोबाईलासह एकूण 2 लाख,22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     LCB चे पथक पेट्रोलिंगवर असताना गुप्त माहिती मिळाली की, काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन येत आहेत आणि बल्लारपूर येथील पुरूष सहकाऱ्यांसह ऑटोने राजुरा येथे विक्रीसाठी जाणार आहेत.या माहितीवरून LCB च्या पथकाने बल्लारपूर-राजुरा-सास्ती मार्गावर सापळा रचून संशयस्पद ऑटोला थांबवून झडती घेतली असता,त्यामध्ये बसलेल्या महिलांच्या पिशव्यांमध्ये 11किलो अवैध गांजा आढळून आला. यावरून आरोपी ऑटो चालक मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह वयवर्ष 38 रा.बल्लारपूर,लालचंद गणेश केसकर वयवर्ष 65 रा. बल्लारपूर,श्रीमती उमा हामु नुनावत वयवर्ष 50 रा.मुळगु जि. वरंगल (तेलंगणा),सौ.ललिता आकाश दामले वयवर्ष 24 रा. ईटारसी(मध्यप्रदेश),कु.आरती गुलाब परते वयवर्ष 28 रा.भोपाळ (मध्यप्रदेश)यांना अटक करण्यात आली तर ओडिशातील मुनीगडा,येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पाराससेठ आणि रामबाबू(दोन्ही पाहिजे असलेले आरोपी)यांची नावे निष्पन्न झाली आहेत.यांच्याविरुद्ध बल्लाररपूर पोलीस स्टेशन,येथे NDPS ॲक्ट प्रणाणे गुन्हा नोंदवून 11किलो गांजा,एक ऑटो क्र.MH/34/BH/ 1626,माबाईल 4,असा एकूण किं.2 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

   सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कॉक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि.संतोष निंभोरकर पोउपनि.सर्वेश बेलसरे,सफौ.स्वामी चालेकर,पोहवा.किशोर वैरागडे,अजय बागेसर,पोअं.गोपीनाथ नरोटे,शेखर माथनकर, मपोअं.छाया निकोडे,अपर्णा मानकर,चापोअं.गजानन मडावी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने केली आहे.

#Action by LCB Chandrapur.

#Ganja Smuglingin Gadchandur.                                                                                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$