Gadchandur Police Take Action Against Modified Bullet Silencers : बेकायदेशीर बुलेट सायलेन्सरविरोधात पोलिसांची विशेष मोहीम!|Marathi News.

News@Modified Silencers...

Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव,यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम,सपोनि.तायडे,यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर शहर व परिसरात कर्कश आवाज करून धुमाकूळ घालणाऱ्या बेकायदेशीर बुलेट सायलेन्सरविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.मुख्य मार्ग व शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन नागरिकांना शांतता राखण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत असून कुणी अशा सायलेंसरच्या बुलेट वापरत असाल तर वेळीच सावध व्हा!अन्यथा कारवाई केली जाईल,असे आवाहन ठाणेदार शिवाजी कदम यांनी नागरिकांना केले आहे.Crime,Modified Bullet Silencers. 

 वाहतूक नियमांना पायदळी तुडवत वाहने चालवणे तसेच मोठ्या आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी विशेषतः फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या सायलेंसर लावून भरधाव वेगाने गाडी चालवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे कायद्याने गुन्हा असून अशा बुलेट चालकांवर कडक दंड ठोठावून सायलेंसर जप्त करण्यात येत आहे.पोलिसांची ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली असून वेळीच सावध व्हा! अन्यथा कारवाई अटळ!

#Gadchandur Police.#Take Action Against Modified Bullet Silencers.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$