Gadchandur : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर शहरात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा कृत्रिम तुटवडा भासत आहे.यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात वऱ्हाडी मंडळी आणि केटरर्सची मोठी पंचाईत झाली आहे.सर्वसामान्यांसह शेतकरी आणि वाहतूकदारांना याचा फटका बसत आहे.डिझेलसाठी अनेक ठिकणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून वाहतुकीसाठी डिझेल नसल्याने मालाची वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे.एकीकडे शासन म्हणतात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे,तर दुसरीकडे याठिकाणी परिस्थिती बिकट बनली आहे. डिझेलसाठी रांगा,पेट्रोलसाठी रांगा,गॅससाठी रांगा,या रांगांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून याला तुटवडा नाही तर काय म्हणावे? अशी विचारणा केली जात आहे.शासन प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गडचांदूर हे औद्योगिक शहर असून शहर व परिसरात 4 सिमेंट उद्योग आहे.अनेक ट्रॉन्सपोर्ट कंपन्या मोठमोठ्या वाहनांद्वारे सिमेंटची वाहतूक करतात.डिझेल नियमित मिळत नसल्याने वाहतूकीवर परिणाम होत आहे.सिमेंट उद्योगांनाही याचा फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.सध्याची परिस्थिती लक्षात घेता काही पेट्रोल पंपांवर 'डिझेल नाही'(नो-स्टॉक)चे फलक लागलेले दिसत आहे तर काहींनी डिझेल बोलावनेच बंद केल्याचे चित्र आहे.दररोज डिझेलचे 2 टॅंकर येत होते,आता एकच येत असल्याने संपूर्ण वाहनांना डिझेलचा पुरवठा करता येत नाही. यामुळे सिमेंट व इतर वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना 3,4 दिवस डिझेलची वाट पहावी लागत असल्याची माहिती एका पेट्रोल पंप संचालकांने दिली आहे.' संबंधीत विभागाने सदर समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करून दिलासा द्यावा अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे.
#Fuel Shortage in Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
