Chandrapur : जिल्ह्यातील मुल पोलीस स्टेशन येथे घरफोडी संदर्भात दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी अमोल इलमकर रा.दुर्गापूर,याला 3 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने ताब्यात घेवून विचारपुस केली असता आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली देऊन चोरी केलेले 105 ग्रॅम सोन्याचे दागिने पंचासमक्ष काढून दिले.तसेच घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेल्या चांदीच्या दागिन्यांपासून बनवलेली लगड वजन 1 कि. 411 ग्रॅम,अशी आरोपीच्या सांगणेनुसार एका महिलेकडून जप्त करण्यात आली असून आरोपीकडे आणखी सखोल विचारपूस केली असता पोलीस स्टेशन मुल येथे मंदिरात झालेली चोरीच्या अनुषंगाने दाखल असलेला गुन्हा केल्याचे सुद्धा उघड झाले आहे.आरोपीकडून 3 घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून सोने व चांदीचे दागिने,एक दुचाकी व एक मोबाईल,असा एकूण 17 लाख,78 हजार,226 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली आहे.पुढील तपासकामी आरोपीला मूल पोलीसच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि.सुनिल गौरकार, पोहवा.रजनीकांत पुट्टेवार,सचिन गुरनुले,संतोष येलपुलवार,गणेश मोहुर्ले,दिनेश आराडे,नितीन कुरेकर,नितीन साळवे,प्रमोद कोटनाके,सुरेन्द्र महंतो,निराशा तितरे,उषा लेंडागे,पोअं.प्रफुल्ल गारघाटे,शेखर माथनकर,अमोल सावे,सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
