Anna Hazare on Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार हवा; अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?!|Marathi News.

News@CJP...

        Anna Hazare on Cockroach Janata Party: गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर धुमाकळू उडवून देत प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय बनू पाहणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची (Cockroach Janata Party)सध्या जोरदार हवा आहे.सोशल मीडियावरील अकाऊंटस आणि पार्टीचे संकेतस्थळ बंद केल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टी हार मानायला तयार नाही. कॉक्रोच जनता पार्टीने नव्या दमाने पुन्हा उभे राहण्याचा चंग बांधला आहे.या पार्श्वभूमीवर एकेकाळी देशात लोकपालची जनचळवळ (Lokpal Movement)उभी करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare)यांनी कॉक्रोच पार्टी बाबत भाष्य केले आहे.Maharashtra Politics news.

          'झुरळ' हे नाव योग्य नसले तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे.मुळात हे समजून घेतले पाहिजे की,या पार्टीने झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता? नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला,हे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे.या दोन्हीचा संगम होतो तेव्हा,सरकारने त्याचा अव्हेर न  करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला.

राज्यात लोकायुक्त कायद्याला जरी संमती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.यावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावे लागते की काय?, असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले.

                       'कॉक्रोच जनता पार्टीवर मोठी कारवाई.'

कॉक्रोच जनता पार्टीचे(Cockroach Janata Party)अधिकृत संकेतस्थळ शनिवारी बंद करण्यात आले होते.जवळपास 10 लाख लोकांनी या संकेतस्थळावर येऊन आपली नोंदणी केली होती.तत्पूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट आणि नंतर इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले होते.एक्स आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉक्रोच जनता पार्टीला तुफान प्रतिसाद मिळाला होता.अवघ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही समाज माध्यमांवर कॉक्रोच जनता पार्टीचे लाखो सदस्य झाले होते.मात्र,कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट,इन्स्टा आणि आता वेबसाईट बंद झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिला होता.

वेबसाईट बंद झाल्यानंतर अभिजीत दिपकेंची केंद्र सरकारवर टीका,म्हणाले...

केंद्र सरकारने आमचे संकेतस्थळ बंद केले आहे.10 लाख जणांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली होती.त्यापैकी 6 लाख जणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.सरकारला कॉक्रोचची इतकी भीती का वाटते? पण सरकारची हुकूमशाही वृत्ती भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहे.आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो हाच आमचा एकमेव गुन्हा आहे.पण तुम्ही इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही.सध्या आम्ही आमच्या एका नवीन घराच्या उभारणीवर काम करत आहोत.झुरळे कधीच मरत नाही, अशी प्रतिक्रिया या कारवाई नंतर संस्थापक अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली.

#Anna Hazare on Cockroach Janata Party.#Cockroach Janata Party.#Maharashtra Politics news.#Lokpal Movement.#Anna Hazare.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$