Action Against illegal Transportation of Cattle : गोवंश तस्करीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!|Marathi News.

News@Crime...

  Chandrapur : जिल्ह्यातील माजरी पोलीस 12 मे रोजी सकाळी पो.स्टे.हद्दीत पेट्रोलिंगवर असतांना गुप्त माहिती मिळाली की, नागपूरकडून येत असलेल्या एका कंटेनरमधून गोवंश जनावरांची अवैध तस्करी होत आहे.यावरून माजरी पोलीसांनी तात्काळ वरोरा ते वणी हायवेवरील कुचना येथे नाकाबंदी करून संशयीत ट्रक कंटेनरला थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र,चालकाने वाहन न थांबविता यु-टर्न घेवून नागपूरच्या दिशेने पळू लागला.पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता, चालकाने कंटेनर उभा करून वाहन सोडून पळून गेला.

  दरम्यान पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता,त्यात एकूण 53 नग गोवंश जनावरे(बैल,गाय,गोरे)अमानुषरित्या भरून कत्तलीसाठी नेत असतांना मिळून आले.यावरून आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये माजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात एकूण 53 नग जनावरे किं.अं. 7 लाख,95 रु.व एक ट्रक कंटेनर क्र.DD/03/R/9840,किं.अं.15 लाख,असा एकूण 22 लाख, 95 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

  सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,वरोराचे SDPO संतोष बाकल, यांच्या मार्गदर्शनात सपोनि.अमित पांडेय,यांच्या नेतृत्वात पोउपनि.हरीदास चोपने,सफौ रमेश तुराणकर,पोअं.ज्ञानेश कोटरंगे,रविंद्र किन्नाके,उमेश उईके,दिलीप मंडल,सर्व पोलीस स्टेशन माजरी,यांनी केली आहे.

Action against illegal transportation of cattle.#Chandrapur District Crime news.

                                     $$$$$$$$$$$$$$$$$$$$