Gadchandur : महिला आरक्षणासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले.काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाविरोधात मतदान करून विकास रोखल्याचा आरोप भाजपने केला आहे.या विधेयकावर एकूण 528 खासदारांनी मतदान केले.या विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते मिळाली.मात्र,दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता असल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नाही.11 वर्षांच्या कार्यकाळात सभागृहात एखादे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.याविषयी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
महिला आरक्षण विधेयक नामंजुर झाल्याने भाजपच्या महिला आक्रमक झाल्या आहेत.ठिकठिकाणी सुरू असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी 29 एप्रिल रोजी समस्त भाजपा नारीशक्ती गडचांदूर मंडळाच्या वतीने महिलांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.स्थानिक भाजप जनसंपर्क कार्यालयातून मोर्चाची सुरूवात करण्यात आली.महिलांनी हातात फलक,काळे झेंडे व मशाल घेवून "महिला आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसचा निषेध असो,नारी शक्ती वंदन विधेयकाचे स्वागत,मोदी है तो मुमकिन है,महिलाओंके सन्मान मे भाजपा मैदान मे,सशक्त नारी सशक्त भारत,महिलांच्या अधिकारावर वार,कांग्रेस आहे जिम्मेदार,नारीशक्ती का अपमान,नही सहेगा हिंदुस्तान" अशा प्रकारच्या गगनभेदी घोषणा देत काँग्रेसचा तीव्र निषेध करण्यात आला.दरम्यान शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक,येथे मोर्चाचे समापन झाले.
यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम,महिला प्रदेश सचिव सौ.रेणुका दुबे,जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ.वंदना शेंडे, जिल्हा महिला मोर्चा महामंत्री सौ.विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा अनुसूचित आघाडी अध्यक्षा सौ.रंजना मडावी,गडचांदूर महिला मोर्चा शहराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.शितल धोटे,सौ.उमा कंटाळे,नगरसेविका सौ.किर्ती वैरागडे,नगरसेविका सौ.संगीता गाऊत्रे,कोषाध्यक्ष सौ.अपर्णा उपलेंचवार,गोंड पिंपरी भाजपा शहराध्यक्षा ॲड.सौ.अरुणा जाभुळकर,सौ.कोमल फरकाळे,सौ. अरुणा बेतावार,सौ.तेजस्विनी झाडे,सौ.पौर्णिमा आवाळे,सौ. त्रिवेना जगताप,सौ.सिंधू कापसे,सौ.इंदुताई कोरे,सौ.पायल येलमुळे,सौ.मनीषा भालेराव,सौ.शारदा फुसाटे,सौ.चंदा बुराटकर, सौ.माया बावनवाडे,सौ.जयश्री येरेकर,सौ.मीनाली सोनटक्के,सौ. भारती गोखरे,सौ.सारिका नामवाड,सौ.प्रीती सातपाडी,सौ. सारिका पिंपळकर,सौ.लताताई दरेकर,सौ.मनीषा भालेराव,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,ज्येष्ठ नेते महेश शर्मा, भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे,भाजपा तालुका संघटक महामंत्री सतीश उपलेंचवार,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे,शहर महामंत्री हरीश घोरे,युवा अध्यक्ष विक्की उरकुडे, महामंत्री तथा नगरसेवक सतीश बेतावार,नगरसेवक हिमांशू नामवाड,नगरसेवक सुरज पांडे,नगरसेवक सुरेश मेश्राम,महामंत्री महेश घरोटे,उपाध्यक्ष अरविंद कोरे,युवा जिल्हा उपाधाक्ष आशिष ताजने,व्यापारी अध्यक्ष ज्येष्ठ नेते विश्वाभर झाम,चिटणीस रमेश चुदरी,देवराव विधाते,शंकर आपूरकर,जयंता भोंगळे,देवीदास पेंदोर,सचिन माली,शाकीर भाई,जगन कापसे,गणपत बुरटकार, योगेश बांदुरकर,गणेश आदे,हरीश कुसले,मनोहर झाडे,संजय नीत,प्रविण सातपाडी,पुरूषोत्तम मेश्राम,यांच्यासह इतर महिला पुरूष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
#Women’s Reservation.#BJP Mahila Morcha in Gadchandur City.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
