Chandrapur : सध्या सुरू असलेल्या आयपीएल (IPL-2026) क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर,स्थानिक गुन्हे शाखा(LCB)ने मोठी कारवाई करत ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे.ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून,याप्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखचे पथक 22 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास रामनगर परिसरात गस्तीवर असताना,गुप्त माहिती मिळाली की,रायतवारी कॉलरी रोडवरील दूध डेअरीसमोर एक तरुण मोबाईलवर 'लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स' या टी-20 क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेत आहे. या माहितीवरून पोलिसांनी पंचासमक्ष सापळा रचून प्रणय व्यंकटेश चिलकमवार वयवर्ष 24 रा.अहेरी जि.गडचिरोली,याला ताब्यात घेवून त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता,तो nice7777 नावाच्या बेकायदेशीर वेबसाईटवर 'आयडी' वापरून पैशांची हार-जीत लावून सट्टा खेळत असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपीने सांगितले की,त्याला ही ऑनलाईन सट्टा आयडी इरफान शेख रा.अहेरी,याने पुरवली होती.सॅमसंग कंपनीचा स्मार्ट मोबाईल फोन किंअं.25 हजार,ऑनलाईन सट्ट्याचे स्क्रीनशॉट आणि व्यवहाराच्या प्रती जप्त करून दोघांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोरकार,पोहवा. सतिश अवथरे,पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार,पोहवा.दिपक डोंगरे, पोहवा.इम्रान खान,पैअं.हिरालाल गुप्ता,पोअं.किशोर वाकाटे, पोअं.शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर,येथील अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.
#IPL Cricket Batting News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
