Ladki Bahin Yojana e-KYC last date 30 April : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ग्राहक ओळख(ई-केवायसी) E-KYC प्रक्रियेसाठी आता केवळ 3 दिवस शिल्लक राहिले आहेत.ई-केवायसीसाठी महिला विकास विभागाने आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ दिली.आता 30 एप्रिल,ही शेवटची मुदत असणार आहे.राज्यातील 26 लाख 34 हजार लाडक्या बहीणींनी ई-केवायसी केलेली नाही.काही अपवाद वगळता 26 लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत.Ladki Bahin Yojana e-KYC last date April 30.
महायुती सरकारची 'लाडकी बहीण',ही महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेचा महायुतीला चांगलाच फायदा झाला.या योजनेची सध्या पडताळणी जोरात सुरु आहे.2 कोटी 47 लाख लाभार्थींपैकी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे.अपात्र ठरलेल्या लाडक्या बहीणींकडून त्यांना देण्यात आलेली रक्कम वसुल न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.12 हजार 415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.या कर्मचाऱ्यांनी घेतलेला लाभ सरकार वसूल करणार आहे.यातील धक्कादायक बाब म्हणजे तेवढ्याच पुरुषांनी या योजनेचा फायदा उचलला आहे.
चुकीची माहिती देणारे,अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न,सरकारची फसवणूक करणाऱ्या अशा लाभार्थींकडून जवळपास 165 कोटी रुपये लाभ वसूल केले जाणार आहेत.या योजनेची पडताळणी शेवटच्या टप्यात आहे.30 एप्रिल रोजी बॅक बंद होण्याच्या वेळे पर्यंत ही पडताळणी सुरू राहणार आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती,उष्णतेची लाट,अशा कारणास्तव ई-केवायसी करण्याची शेवटची(एप्रिल अखेर)संधी लाडक्या बहीणींना देण्यात आली आहे.26 लाख 34 हजार लाडक्या बहीणींनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही.ह्या लाडक्या बहीणींकडे ई-केवायसी करण्यास पुरेशी कागदपत्रे नाहीत,असे आढळून आले आहे.या लाडक्या बहीणी शेवटच्या 3 दिवसात ई-केवायसी पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे.एप्रिल अखेर या योजनेची सद्यस्थिती स्पष्ट होणार आहे.संवेदशील योजना म्हणून सरकारने या योजनेबद्दल ‘लपवाछपवी’ केली आहे.एप्रिल नंतर काही अपवाद वगळता जवळपास 26 लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची शक्यता महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
#Ladki Bahin Yojana Update.#Ladki Bahin Yojana e-KYC last date April 30.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
