Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक,यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ व इतर अवैध धंद्यांवर कारवाईची मालिका सुरू असून याच श्रेणीत 22 एप्रिल रोजी सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने ओडिसा राज्यातून चंद्रपूरात गांजाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक करून 8.015 किलो गांजा जप्त केला आहे.
सदर कारवाई संदर्भात सविस्तर असे की,LCB चे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की,एक व्यक्ती ओडिसा राज्यातून गांजाची मोठी खेप घेऊन चंद्रपूर शहरातील राष्ट्रवादी नगर भागात विक्रीसाठी येणार आहे.या माहितीच्या आधारे स्थानिक कुंदन प्लाझा चौक,नागपूर रोड येथे नाकाबंदी करून सापळा रचण्यात आला.रात्री अंदाजे 1 ते 2 च्या सुमारास वर्णनाप्रमाणे एक संशास्पद व्यक्ती प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसली.त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता,त्याच्याजवळील पिशवीत 8.015 किलो वजनाचा ओला गांजा(पाने,फुले व बिया)आढळून आला.शहादेव ठाकूरदास मलिक वयवर्ष 53,रा.ठाकूरनगर ता.चामोर्शी जि.गडचिरोली (हल्ली मुक्काम राष्ट्रवादी नगर चंद्रपूर)असे आरोपीचे नाव असून आरोपीने हा गांजा ओडिसा राज्यातून तस्करी करून आणल्याची कबुली दिली आहे.गांजा 8.015 किलो किंअं.2 लाख,एक वापरता जुना मोबाईल किंअं.10 हजार,असा एकूण 2 लाख,10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीला अटक करून रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल काण्डी गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार, पोहवा.सतिश अलथरे,पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार,पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.इम्रान खान,पोअं.हिरालाल गुप्ता,पोअं.किशोर वाकाटे,पोअं.शशांक बदामवार,सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.#Action By LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
