Shocking Incident : सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू!|Marathi News.

News@Snakebite...

Chandrapur : जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सर्प पकडताना एका सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 5 आक्टोबर रोजी सकाळी 10,30 च्या सुमारास घडली.महेंद्र भडके वयवर्ष 32 रा.विद्यानगर वार्ड,सावित्रीबाई फुले चौक बल्लारपूर,असे मृत सर्पमित्राचे नाव असून पेपर मिल परिसरातील न्यू कॉलनी,येथील नर्सरीमध्ये नाग जातीचा सर्प दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर महेंद्र सर्प पकडण्यासाठी तेथे गेला होता.

सर्प पकडण्याच्या प्रयत्नात असताना सर्पाने त्याला दोनदा दंश केला.दरम्यान महेंद्रला उपचारासाठी तातडीने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला.सर्पमित्र म्हणून महेंद्रची ओळख होती.विविध भागातील साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे कार्य तो करत होता.त्याच्या अशा आकस्मिक निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

#Shocking Incident.#Death by Snakebite.#Death of a Snake Friend due to Snakebite.

              @@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-