Car Truck Accident : उभ्या ट्रकला कारची मागून जोरदार धडक!| Marathi News.

News@Accident...

Gadchandur : पोलीस स्टेशन हद्दीतील थुटरा बसस्थानक जवळ KTC ट्रान्सपोर्ट कंपनीच्या डिझेल पंपा समोर उभ्या एका ट्रकला कारने मागून धडक दिल्याने कारमधील 4 पैकी 2 जण किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे. सदर अपघात 30 सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री 8 च्या जवळपास घडला आहेत.

       प्राप्त माहितीनुसार 4 जण रात्रीच्या सुमारास(आय 20) क्रं.MH/34/BF/4570,कारने राजुरा वरून गडचांदूर येथील एका नातेवाईकांकडे येत होते.मार्गावरील अंबुजा फाटा ओलांडून थुटरा बसस्थानक जवळील हायवे लगत असलेल्या KTC ट्रान्सपोर्टच्या डिझेल पंपासमोर KTC कंपनीच्या ट्रक क्रं.TS/01/UC/0951,या वाहनाला कारने मागून जोरदार धडक दिली.नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवीतहानी झाली नसून या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.अपघातानंतर कारच्या एअरबॅगमुळे जीवीतहानी झाली नसली तरी कारमधील 4 पैकी 2 किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर गडचांदूर येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात नेले आहेत.घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र, तोपर्यंत जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले होते. पोलीसांनी ट्रक आणि कारला रस्त्याच्या बाजूला करून पंचनामा केला.पुढील तपास गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

                “हायवेवर उभी वाहने मोठी समस्या.”

अंबुजा फाटा-गडचांदूर हायवे वरील KTC मोटार ट्रान्सपोर्ट कंपनीचे स्वतःचे डिझेल पंप आहे.दिवसरात्र याठिकाणी त्यांची मोठमोठी वाहने डिझेल भरायला येतात.वास्तविक पाहता ही वाहने डिझेल पंपच्या कंपाऊंडमध्ये उभी करायला पाहिजे.परंतू ही वाहने चक्क हायवेवर रस्त्याच्या कडेला एकामागे एक उभी असतात.अपघात टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी चालकाने इन्डीकेटर लाईट सुरू ठेवणे सुद्धा गरजेचे आहे.जेणेकरून मागून येणारे वाहन चालक सावध होऊन अपघात घडणार नाही.हीच परिस्थिती थुटरा बसस्थानकाच्या पुढील पेट्रोल पंपासमोर आहे.याठिकाणी तर हायवेच्या दुतर्फा ट्रकांची भलीमोठी रांगच रांग दिसते. जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून वाहतुक पोलीसांकडून वारंवार होत असलेल्या कारवाई नंतरही याठिकाणची परिस्थिती बदलत नसल्याचे पाहून यावर दुसरा कायमस्वरूपी समाधानकारक उपाय नसेल का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थिती केले जात आहे.

#Car Truck Accident. # vehicles are a big problem.

                     @@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-