Gadchandur : येथे नुकतेच राजुरा विधानसभेचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात माजी आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदा संदर्भात उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “आम्ही सोबत लढू(महा वी.आघाडी)आणि नगराध्यक्ष कॉंग्रेसचा राहील” याविषयी नगराध्यक्षासाठी इच्छुक असलेले शिवसेना(UBT)चे कोरपना तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक सागर ठाकूरवार,यांना दुर्ध्वनीवरून संपर्क करून मत जाणून घेतले असता त्यांनी अशाप्रकारे मत व्यक्त केले.
“माजी आमदार तथा कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले,आम्हाला काही विचारले नाही.आमचे मत विचारले नाही,त्यांनी आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केले.आमचे वरिष्ठ (जिल्हाप्रमुख,कोर कमिटी)हे जेव्हा डिसाइड करेल तेव्हांच युती होईल.महा वि. आघाडीचे धर्म पाळत आम्ही लोकसभेत कॉंग्रेसचे काम केले,विधानसभेतही कॉंग्रेसचे काम केले.आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमचा इंटरेस्ट नाही, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही,त्यांनाच देणार आहे.दरवेळी आम्ही तुमचच काम करायचं,मग तुम्ही आमचं केव्हा करणार? सहसा मी नगराध्यक्षासाठी राहिल,जर शिवसेनेकडून तिकीट नाही भेटली तर आम्ही आघाडीतून निघून स्वतःची आघाडी तयार करून निवडणूक लढू. त्यांच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही.मी दोन-तीनदा पुर्ण पॅनलसह नगरसेवक म्हणून निवडून आलो,मी या पदासाठी प्रबळ दावेदार आहोत.अखेर आम्हाला कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागेल.मी नगराध्यक्षाची निवडणूक लढणारच.” असे ठाम मत सागर ठाकूरवार यांनी व्यक्त केले.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता नगर परिषदेसह जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर इच्छुक राजकीय पदाधिकार्यांनी दावे प्रतिदावे करायला सुरु केली आहे. बऱ्याच वर्षांनंतर गडचांदूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण(ओपन)आरक्षण निघाले आहे. यामुळे येथे उमेदवारांची मोठी गर्दी होणार असल्याचे चित्र आहेत.आलेल्या या संधीचे सोने नाही केले तर पुढे जवळजवळ 35,40 वर्ष संधी नसल्याचे बोलले जात असून आता अध्यक्षपदासाठी कोण कोणत्या पक्षात काय काय घडामोडी घडतात? हे चित्र लवकरच स्पष्ट होईल यात दुमत नाही.
#Political News. #Gadchandur Municipal Council Election.
$$$$$$$$$$$$$$$$$

