Bike Accident : दोन वेगवान दुचाकीची समोरासमोर धडक,तीन ठार!|Marathi News.

News@Accident...

          Chandrapur : जिल्ह्यातील मूल-मारोडा मार्गावरील बलकी देव मंदिराजवळील वळणावर  8 आक्टोबर रोजी दुपारी जवळपास 1,30 च्या सुमारास 2 वेगवान दुचाकींची समोरा-समोर टक्कर झाली.या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये बापलेकाचा समावेश आहे. 

          प्राप्त माहितीनुसार,मारोडा येथील यश देवीदास शेंडे वयवर्ष 22 आणि त्यांचे वडील देवीदास कवडू शेंडे वयवर्ष 45,हे मुलवरून शेतीचे ऑनलाईन काम आटोपून दुचाकी क्रं.MH/34/BX/8863,ने मारोडाकडे जात होते.दरम्यान शिवापूर चक भादुर्णा,येथील वासुदेव सहारे वयवर्ष 45,हे आपल्या दुचाकीवरून मूलकडे येत होते.इतक्यात बलकी देव जवळील वळणावर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक झाली.धडक इतकी जोरदार होती की,यश शेंडे आणि वासूदेव सहारे,यांचा जागीच मृत्यू झाला,तर देवीदास शेंडे गंभीर जखमी झाले.

        घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी देवीदास यांना मुल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र,उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतांमध्ये बापलेकाचा समावेश असून यांचा मृत्यू वेदनादायक ठरला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मारोडा गावात शोककळा पसरली आहे. दोन्ही वाहन चालकांविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास मुलचे ठाणेदार विजय राठोड, यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत.

#Shicking News. #Bike Accident in Chandrapur District.

                                  $&$&$&$&$&$&$&$

-:Advertisement:-