Chandrapur-Korpana : राजुरा-गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना 10 आक्टोबर रोजी कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळ दुपारी अंदाजे 3 च्या सुमारास एका आर्टिका कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली.या अपघातामध्ये दुचाकीस्वारापैकी एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरपना तालुक्यातील नांदा फाटा,येथील अरुण मोहजे व अशोक मोहजे,हे दोघे भाऊ MH/34/BW/5675,या दुचाकीने कोरपनावरून गडचांदूरकडे येत होते.आणि आर्टिका कार क्रं.TS/01/EL/ 1570,ही गडचांदूरवरून तेलंगणाकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे कळते.घटनेची माहिती कोरपना पोलिसांनी घटनास्थळी गाठून दोघांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.मात्र,यातील प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून दोघांना तात्काळ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र,गंभीर जखमी असलेल्या अशोक मोहजे वयवर्ष 56, यांचा उपचारादरम्यान सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. अरूण मोहजे यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे दोघेही भावंड त्यांच्या नातेवाईकाच्या अंतिम संस्काराला गेले होतो.परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.सदर घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा असून हळहळ व्यक्त होत आहे.
#Highway Accident. #Ertiga Car & Scooty Accident.
&&&&&&&&&&&&&&&

