Crime : मालकाला लुटण्यासाठी कार चालकानेच रचला होता कट!| Marathi News.

News@Crime...

     Rajura : हंसराज किसनराव दिघाडे वयवर्ष 55 रा.तुकूम चंद्रपूर,हे 24 सप्टेंबर रोजी रात्री 9/30 च्या दरम्यान ड्रायव्हर सोबत टाटा एन्ट्रॉ कारने गडचांदूर वरून मार्केटिंगची रोख रक्कम घेऊन हायवेने राजुराकडे येत असतांना राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका ठिकाणी 3 अनोळखी व्यक्तींनी त्यांची कार थांबवून लोखंडी रॉडने धमकावून त्यांच्या ताब्यातील एकूण 93 हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून नेले.अशाप्रकारे 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आली.

       दरम्यान फिर्यादी सोबत असलेल्या वाहन चालकाला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन व्यवस्थितरित्या सखोल विचारपूस केली असता,त्याने त्याच्या 3 साथीदारासह कट रचून सदर गुन्हा केल्याची कबूली दिली. यावरून सौरभ देविदास निलेवार वयवर्ष 23,जाकीर सादीक शेख वयवर्ष 25,अरबाज जाकीर शेख वयवर्ष 24, मुजाहिद अहद शेख वयवर्ष 26,सर्व रा.चंद्रपूर यांना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेल्या रक्कमेपैकी 42 हजार 300 रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किं.अंदाजे 70 हजार,असा एकूण 1 लाख,12 हजार 300 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून पूढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार,यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमीत परतेकी,यांच्या नेतृत्वात सपोनि.हेमंत पवार,पोउपनि.दिपक ठाकरे,सफौ. किशोर तुमराम,पोहवा.विक्की निर्वाण,रामेश्वर चहारे,महेश बोलगोडवार,शफीक शेख,आनंद मोरे,बालाजी यामजवार, शरद राठोड,राजू दुबे यांनी केली आहे.

#Action by Rajura Police. #Chandrapur District Crime News.

               $$$$$$$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-