Online Fraud Case : ऑनलाईन गुंतवणुकीच्या नादात व्यापाऱ्याने गमावले 28 लाख!|Marathi News.

News@Online Fraud...

         Chandrapur : सहज आणि प्रचंड नफा मिळेल,अशा खोट्या आमिषाला बळी पडत बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 28 लाख 23 हजारांची फसवणूक झाली आहे.काही अज्ञात गुन्हेगारांनी बनावट मोबाईल ॲप्स,व्हॉट्सॲप ग्रुप व फसव्या संकेत स्थळांचा वापर करून संगणकीय तंत्रज्ञाचा गैरवापर करत हा गुन्हा घडवून आणला आहे.

           प्राप्त माहितीनुसार,बामणी येथील व्यापारी महोम्मद रफ़ीक महोम्मद फज़ल वयवर्ष 46,यांच्याशी 8 जुलै 2025 रोजी एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप वरून संपर्क साधत गुंतवणुकीच्या ग्रुपमध्ये ओढले.यानंतर विविध ॲप्स व खोट्या वेबसाईट लिंकद्वारे त्यांना उच्च नफ्याच्या खोट्या आश्वासनांनी प्रवृत्त केले.सुरूवातीला लहान व्यवहार करून रफ़ीक,यांचा विश्वास जिंकण्यात आला.त्यानंतर त्यांच्याकडून हळूहळू तब्बल 28 लाख 23 हजार रुपये विविध बँक खात्यात UPI,IMPS,RTGS व नेट बँकिंगद्वारे उकळून घेतले गेले.ॲप्समध्ये 300 टक्क्यांपर्यंत नफा दाखवत प्रचंड कमाईचे आमिष दाखवण्यात आले.मात्र,पैसे परत घेण्याचा प्रयत्न होताच संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आणि मोठी फसवणूक उघडकीस आली.

           या गंभीर गुन्ह्याबाबत बल्लारपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 200 कलम 66(ड),तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5),318(4)अन्वये गुन्हा नोंदविला आहे.पुढील तापास पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे,यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.सदर घटनेमुळे ऑनलाईन गुंतवणूक योजनांच्या नावाखाली सुरू असलेल्या संघटीत फसवणूक रॅकेटचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.

                             'नागरिकांना आवाहन.' 

         अनोळखी ॲप्सलिंक व गुंतवणूक ग्रुप्सपासून सावध राहण्याचे तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहेत.

#Chandrapur District Online Fraud Case.

                     @@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-