Police Action Against Cattle Smuggling : गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई!|Marathi News.

News@Cattle Smuggling....

  Chandrapur : जिल्ह्यातील उमरी पोतदार पोलिसांना 11 ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की,2 पिकअप वाहनांमध्ये गोवंश जनावरांची तस्करी करून कत्तलीसाठी नेत आहेत.या माहितीवरून पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा डोंगर हळदी मार्गावर पोलीस स्टॉफ व पंचासह नाकाबंदी केली असता 2 पिकअप वाहने येताना दिसले.त्यांना थांबवून पंचासमक्ष तपासणी केली तेव्हां त्यामध्ये एकूण 25 नग जनावर कोंबून दिसून आले. सदर जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.यावरून मंगेश शामराव चौधरी वयवर्ष 28 रा. लक्कडकोट,राजेश गजानन घोगरे वयवर्ष 27 रा.बेंबाळ, मोहम्मद अजीज अली वयवर्ष 24 रा.वाकडी आणि मिर्झा अजीज बेग वयवर्ष 22 रा.वाकडी,यांच्याविरुद्ध उमरी पोतदार पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

  आरोपीकडून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रं.TS/20/T/ 4967 आणि MH/34/BZ/8425 तसेच 25 नग गोवंश जनावरे व 4 नग मोबाईल,असा एकूण 28 लाख,95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर प्रकरणाची पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले,यांच्या मार्गदर्शनात उमरी पोतदार पोलीस स्टेशनचे सपोनि.राहुल ठेंगणे,यांच्या नेतृत्वात पोहवा.सुभाष राऊत,पोअं.सतीश झाडे,पैअं.विनोद चौधरी,पोअं.राहुल शंखावार,पोअं.सुरज बुजाडे,चापोअं.दिनेश देवाडे व पोअं.गोपाल घुमडेवाड सर्व पोस्टे.उमरी पोतदार,यांनी केली आहे.

#Cattle Smuggling. #Police Action Against Cattle Smuggling.#Chandrapur District Crime News.

                      $$$$$$$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-