Chandrapur : दिवाळीसाठी ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत असतांना ऑनलाईन सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत.फेस्टीवलच्या विविध ऑफरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचाही “सेल मोड” ही ऑन झालेला आहे.बनावट ई-कॉमर्स वेबसाईट,फेक कुपन कोड्स,क्युआर स्कॅम,रिवार्ड्स पॉईन्ट,कॅशबॅक ईत्यादिंच्या नावाखालील डेटा चोरणारे ॲप्स झपाट्याने वाढत आहेत.
माहे ऑक्टोंबर 2025,हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरुकता म्हणून पाळला जात असून या महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय व ईतर शैक्षणिक ठिकाणसह वेस्टर्न कोल्ड फिल्डस लि.च्या वेगवेगळ्या एरीया मधील कार्यालयात नागरीकांना सायबर स्वच्छता,ऑनलाईन फसवणुक प्रतिबंध आणि सुरक्षित डिजीटल पद्धतीबद्दल व्यावहारीक ज्ञान देऊन सक्षम करण्याचे उद्देशाने सतत सायबर जनजागृती कार्यक्रम घेणे सुरू आहे.
सध्या दिवाळी सणा निमित्त बरेच नागरीकांचा वेगवेगळ्या गावात,शहरातून आवागमन सुरु आहे.त्यातच सुट्ट्यांचा कालावधीत बँक सुध्दा बंद असल्याने सायबर गुन्हेगारां कडून याचवेळी नागरीकांना वेगवेगळ्या फसव्या कॉल करून त्यांची आर्थीक हाणी होण्याची शक्यता पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेने चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन,येथे सायबर पोलीस स्टेशनचे पथक पाठवून प्रवाशांनी देखील दीपावली निमित्त सायबर सुरक्षा जनजागृती संदेश देण्यात येऊन पॉम्पलेट वाटून सुरक्षित ऑनलाईन व्यवहार,दीपावलीतही डिजीटल सजगता ठेवण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली असून नागरीकांनी खात्यातून पैसे गेल्याचे समजताच शक्य तितक्या लवकर सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात शक्यतो लवकरात लवकर 1930 किंवा 1945,या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.किंवा cybercrime.gov.in यावर ऑनलाईन रिपोर्ट करावा.तसेच मोबाईल हरविल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन रिपोर्ट करण्यासाठी माहिती देऊन सायबर गुन्ह्यापासून सुरक्षिततेचे उपाय योजनाबाबत जनजागृती करण्यात आली.
#Crime. #Online Shopping.#Chandrapur District Police.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

