Gadchandur : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसांत होणार आहे. नुकतेच नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी आरक्षण जाहीर झाले.यावेळी येथे नगराध्यक्षासाठी सर्वसाधारण(0pen) आरक्षण निघाल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून बाशिंग बांधून बसलेल्यांना ही संधी गमवायची नसल्याचे दिसून येत आहे.आतापासूनच कित्येक इच्छुकांना नगराध्यक्ष पदाचे वेध लागले आहेत.सध्याच्या परिस्थितीत शहरातील राजकिय वातावरण टाईट असून सर्व पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.काहींना आतापासूनच “मी नगराध्यक्ष झाल्यावानी वाटते” असे स्वप्न पडत असेल तर आश्चर्य वाटायला नको? असे असताना एक प्रश्न पडतो की,या निवडणुकीत मतदारांच्या विविध समस्यांचे काय? पुर्वी पेक्षा यंदा भावी नगराध्यक्षांनी काहीही केले,कितीही आश्वासन,प्रलोभने दिली,काम फत्ते होणार नाही? “बहुत कठीण है डगर पनघट की” यानिमित्ताने असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.शेवटी मतदार राजा सुज्ज्ञ आहे.
वास्तविक पाहता गडचांदूरकरांना हल्ली अनेक अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागत आहे.मुख्य म्हणजे,अवैध पार्किंग,माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे डस्ट प्रदुषण आणि दुर्गंधीयुक्त कचरा,अशा समस्यांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.यावर आजपर्यंत समाधानकारक काहीच घडले नाही,हे तेवढेच खरे! याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रं.1,येथील रहिवासी “प्रा.सैय्यद ज़हीर” यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे की, 'वारंवार आंदोलन करूनही जेव्हा माणिकगड सिमेंट ऐकत नाही! याचा अर्थ गडचांदुरच्या राजकारण्यांमध्ये कोणतीही अशी दमदार व्यक्ती नाही,जी माणिकगड सिमेंटची मुजोरी रोखू शकते,डस्टची समस्या दूर करू शकते.असे नसेल तर मग नगर परिषद अध्यक्ष का म्हणून निवडून द्यायचं,मलाई खाण्यासाठी? नक्कीच नाही.म्हणून नगराध्यक्ष निवडताना अशा उमेदवाराला निवडायचं,जो नागरिकांची समस्या सोडवेल,जो माणिकगड सिमेंटच्या मुजोरीला दबणार नाही, किंवा गुपचूप पाकिट घेऊन गप्प बसणार नाही.माणिकगड कंपनीच्या डस्ट प्रदुषणावर कार्यवाही करेल व ती समस्या दूर करेल आणि विशेष म्हणजे जी कचऱ्याची दुर्गंधी येते, त्यावर उपाययोजना करेल.अशाच उमेदवाराला नगराध्यक्ष म्हणून निवडायचं,अशा उमेदवारालाच मी आणि माझा परिवार,नातेवाईक मतदान करेल,असं माझं ठाम मत आहे.
विशेष म्हणजे,जो कोणी नगराध्यक्ष उमेदवार राहील,मग तो कोणत्याही पक्षाचा असो की,अपक्ष असो,त्याने आपल्या जाहीरनाम्यात माणिकगड कंपनीपासून निर्माण होणारी समस्या,शहरातील अवैध पार्किंग,या समस्यांचा उल्लेख करणे आणि त्याला सोडविण्याचे लिखीत आश्वासन देणे गरजेचे आहे.ही अट मान्य असेल तरच घरासमोर मत मागायला यायचं अन्यथा आम्ही सुज्ज्ञ आहो' असे परखड मत प्रा.ज़हीर यांनी 'कोरपना Live' सोबत बोलताना व्यक्त केले आहे.
#Gadchandur N.P.Election 2025.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&

