Gadchandur : नगर परिषदेची निवडणूक तोंडावर असताना महाविकास आघाडीमध्ये 'एकला चलो रे' चे सूर उमटत आहे.याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा शिवसेना (UBT)जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचांदूर शासकीय विश्रामगृह येथे 19 आक्टोबर रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी यावेळी लाऊन धरली.मागील काळातील काम पाहता सध्या शहरात शिवसेना (UBT)ची ताकत वाढली आहे.यामुळे यंदा युती नाही स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांनी दिला.दरम्यान सचिन गौरकार,श्रीकांत घोरपडे,सुरज पाटील,राजु गेडाम यांनी शिवसेना(UBT)पक्षात जाहीर प्रवेश केला.जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सर्वांना भगवे दुपट्टे टाकून पक्षात प्रवेश दिला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येत्या काही दिवसांत विविध पक्षाच्या तरूण कार्यकर्त्यांचा शिवसेना(UBT) पक्षात मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे कळते.
सदर बैठकीत माजी नगरसेवक तथा राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार,माजी नगरसेवक सरवर शेख, तालुकाप्रमुख अक्षय गोरे,शहरप्रमुख प्रणित अहिरकर, माजी उपशहरप्रमुख राजीव पावडे,प्रदीप गुड्डेल्लीवार, सुधाकर ताजने,रजत ठाकुरवार,यश ठाकूरवार,कृष्णा भोयर,प्रशांत पात्रे,संदीप धनविजय,संजय पांडे,पुरुषोत्तम जोगी,शेख अहमद,राजू (इर्शाद)कादरी,दर्शन कोडापे, प्रविण तिखट,वैभव मेंढी,करण गिरपूनजे,छोटू कावडे, अंकीत चन्ने,यश टेकाम,सुरज निखाडे,सुरज डावरे,तुषार भंडारे,संजय गिरपूनजे,ब्रिजेश पांडे,करण दुबे,ओम मालेकर,हिमांशू डाखोरे,बाल्या मथुलकर,राजू गेडाम,विनय वासेकर इतरांची उपस्थिती होती.
#Gadchandur N.P.Election 2025.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&

