Gadchandur N.P.Election 2025? : कोण होणार नगराध्यक्ष?|Marathi News.

News@N.P.Election 2025...

       Gadchandur : विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता नगर परिषदेसह जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे.यासाठी इच्पाछुक राजकीय पदाधिकार्‍यांनी पूर्व तयारी सुरु केली आहे.दरम्यान,काही उच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शहरात नगरपालिका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक मंडळी सज्ज झाली आहे.

     याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगर परिषदेचा कार्यकाळ 19 फरवरी 2025 रोजी संपला.प्रशासकीय यंत्रणा याठिकाणी कारभार सांभाळत आहेत.दरम्यान गडचांदूर नगर परिषदेसाठी सर्वसाधारण(ओपन)आरक्षण आल्याने नगराध्यक्षासाठी काही हवशे,नवशे,गवशे,चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे चित्र असतांना पक्षश्रेष्ठी एकालाच उमेदवारी देणार,हे तेवढेच खरे.मग इतर नाराज पक्षासोबत एकनिष्ठता दाखवतील की,उघड अथवा गुप्तपणे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न करतील? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

        कॉंग्रेस पक्षात 3 ते 4 इच्छुक दिसत आहे तर भाजपचे दोन्ही गुट एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे.राजुरा विधानसभेत भाजपची सत्ता आहे.याठिकाणी देवराव भोंगळे विद्यमान आमदार आहे. पक्षात उफाळून आलेली अंतर्गत गुटबाजी,कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरत असून अशा परिस्थितीत गडचांदूर नगर परिषद काबीज करण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.दरम्यान राजुरा विधानसभेत झालेल्या सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.या सर्व बाबी लक्षात घेता 'अखेर कोण होणार गडचांदूरचा नगराध्यक्ष? 'यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात अहेत. 

#Gadchandur N.P.Election 2025.?

                $$$$$$$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-