Gadchandur : या महागाईच्या काळात कष्टाच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी होतो,तेव्हा मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागतो.तेव्हा हताश होवून तो परत मिळविण्याची आशा नसतांनाही औपचारिकता म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवली जाते.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या तक्रारीचा सायबर पोलीस पथकाने छडा लावला आहे.गेल्या 1 महिन्याच्या कालावधीत चोरीस गेलेले जाळपास 2 लाखांचे 14 मोबाईल पोलिसांनी शोधून ते पुन्हा मुळ मालकांना परत केले आहे.मोबाईल परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करत मुळ मालकांनी गडचांदूर पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे.सदर मोबाईल पोलिसांनी परराज्यात जाऊन आणले हे मात्र विशेष.इतर मोबाईलचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल संच हरविले, चोरी झालेले,अशा तक्रारी पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्या होत्या.त्या तक्रारीतील आयएमईआय(IMEI) एकत्रित करून सायबर पोलीस पथकाने संबधित मोबाईल कंपनीशी संर्पक साधला.त्यांच्या सीईआयआर(CEIR) पोर्टलचा वापर करून हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकाची नेमणूक केली. शोधून काढलेले मोबाईल ठाणेदार शिवाजी कदम व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मूळ मालकांना परत दिले आहेत.
हरवलेले मोबाईल परत मिळतील? अशी आशा सोडलेल्या नागरीकांना ते मोबाईल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.ठाणेदार कदम यांच्या नेतृत्वात गडचांदूर पोलिसांच्या विविध कामात सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव,यांच्या मार्गदर्शनात,ठाणेदार शिवाजी कदम,यांच्या नेतृवात सायबर पोलीस पथकाचे शोध घेणारे पोलीस अंमलदार महेश चव्हान व महिला पोलीस अंमलदार मनीषा झोडे, यांनी सातत्याने परिश्रम घेवून हे मोबाईल शोधून काढले आहेत.
'ठाणेदाराचे नागरिकांना आवाहन'
'नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या जवळील मोबाईल संच,दुचकी व इतर वस्तूंची नीट काळजी घ्यावी, सदर वस्तू चोरीस गेल्या किंवा हरवल्यास पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी,असे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी नागरिकांना केले आहे.तसेच बाजारात वावरत असतांना मोबाईल वरच्या खिशात वापरू नये कारण बाजारातील मोबाईल ट्रेस होत नसल्याची माहिती सुद्धा ठाणेदार कदम यांनी दिली आहे.
#Gadchandur Crime News....
&&&&&&&&&&&&&&&&&&&&

