Korpana : तालुक्यातील हातलोणी येथील एका तरूण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 7 आक्टोबर मंगळवार रोजी घडली.गजानन पुनम मालेकर वयवर्ष 38,असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अति पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान व कर्ज असल्याने तो सतत चिंताग्रस्त राहायचा.मंगळवारी रात्री विष प्राशन केल्या नंतर,त्याला कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले.मात्र, दुर्दैवाने उपचारा दरम्यानच त्याचा मध्यरात्री जवळपास एकच्या सुमारास मृत्यू झाला.त्याची कुकुडबोडी येथील शेत शिवारात एक हेक्टर शेत जमीन आहे.त्याच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज होते. अशी माहिती आहे.त्याच्या मागे आई वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,असा बराच मोठा परिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मायबाप सरकारने लवकरात लवकर संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
#Farmers Suicide in Korpana Taluka. #Shocking Incident.
@@@@@@@@@@@@@@@

