Crime : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड! Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यातील चिमुर पोलिसांना 6 आक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाली की,मौजा रेनगाबोडी व जामणी जंगल शेतशिवारात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे.या माहितीवरून सस्टॉफ व पंचासह पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता एका कापडाच्या तंबूमध्ये काही व्यक्ती ताश पत्तयावर हार-जीतची बाजी लावून जुगार खेळतांना मिळून आले.सदर धाडीत सुधीर पोहीनकर रा.जामनी,रजतकुमार नागवंशी रा.छिंदवाडा,पांडूरंग रामाजी फलके रा.समुद्रपूर,अमन भोसले रा.सेलू,सुरज कोपरकर,फकीरा काकरवार रा.सेलू, मंगेश गुडघे रा.कोरा,सुखदेव अवचट रा.समुद्रपुर,सचिन धोटे रा.समुद्रपुर,नुमान कुरेशी रा.भद्रावती,यांना पोलिसांनी जागेवरून ताब्यात घेतले तर गोलू राऊत रा.समुद्रपुर, जिवन सिडाम रा.जामणी व अनिल जाधव रा.शेगांव,हे तिघे अंधाराचा फायदा घेवून फरार झाले.एकूण 13 आरोपी विरुद्ध चिमूर पोलीस स्टेशन,येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीकडून 1 लाख,25 हजार रोख तसेच 6 चारचाकी व 3 दुचाकी वाहने,चॉर्जीग बॅटरी, सतरंजी,एलईडी व इतर साहित्य,असा एकूण 27 लाख,90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पूढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चिमुर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे,यांच्या मार्गदर्शनात चिमुरचे ठाणेदार दिनेश लबडे,यांच्या नेतृत्वात सपोनि. अमोल बारापात्रे,पोआं.सचिन सायंकार,अतूल ढोबळे, निलेश बोरकर,कुणाल दांडेकर,गणेश वाघ,हर्षल शिरकुरे, उमेश चरफे,रोहित तुमसरे,फाल्गुन परचाके,सौरभ महाजन अविनाश राठोड,सर्व पोलीस स्टेशन चिमुर यांनी केली आहे.

#Crime News. #Chandrapur District Crime News Apdate.

                              $$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-