Gadchandur : शहर पोलिसांना 20 आक्टोंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की,रेकॉर्डवरील गुन्हेगार 'छोटू सुर्यवंशी' हा आपल्या साथीदारांसह काळ्या रंगाच्या डस्टर कारने दादामिया ट्रॉन्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळी जागा,गंजवार्ड चंद्रपूर,येथे देशी कट्टा घेवून येणार आहे.आशा माहिती वरून शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार,गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासह सदर ठिकाणी सापळा रचून त्याठिकाणी उभ्या काळ्या रंगाच्या डस्टर वाहनाजवळ उभे असलेल्या 4 इसमांना शिताफीने ताब्यात घेवून वाहनाची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये 2 माऊझर गन(पिस्टल),2 देशी कट्टे,35 नग जिवंत काडतूस तसेच 4 लोखंडी धारदार खंजर,अशा प्रकारच्या घातक हत्यार मिळून आल्या.यावरून सदर आरोपींविरुद्ध शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर,येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
आरोपीतांच्या ताब्यातील घातक हत्यार,1 दुचाकी,2 चारचाकी वाहन,4 नग मोबाईल व इतर साहित्य,असा एकूण 16 लाख,45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पूढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले,यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशीकांत रामटेके,यांच्या नेतृत्वात सपोनि.राजेंद्र सोनवणे,पोउपनि. दत्तात्रय कोलटे,विलास निकोडे,पोहवा.लक्ष्मण रामटेके, संजय धोटे,इमरान शेख,सचिन बोरकर,निकेश ढोंगे,जावेद सिद्दीकी,भावना रामटेके,कपूरचंद खैरवार,रुपेश पराते, निलेश ढोक,योगेश पिदुरकर,विक्रम मेश्राम,प्रफुल्ल भैसारे, दिपीका झिंगरे,सारीका गौरकार सर्व पोस्टे.चंद्रपूर शहर यांनी केली आहे.
#Crime. #Big Action by City Police Chandrapur. #Chandrapur District Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$

