Chandrapur : जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांना 17 आक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की,चंद्रपूर ते आष्टी रोडवर एक महिंद्रा स्कॉर्पिओ क्रं.MH/ 30/AF/4656,ने अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक होत आहे.या माहितीवरून गोंडपिपरी पोलिसांनी डांबर प्लॉन्टजवळ नाकाबंदी केली.दरम्यान सदर वाहन येताना दिसल्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत कापसाच्या शेतात पळून गेला.
वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली तेव्हा त्यामध्ये देशी दारु संत्रा 90 ML च्या 51पेट्या किं.अंदाजे 2 लाख,40 हजार आणि रॉयल स्टॅग 180 ML180 च्या 5 पेट्या किं.अंदाजे 62 हजार, 400,असा एकूण 2 लाख,66 हजार 400,महेंद्रा स्कॉर्पिओ वाहन किं.अंदाजे 10 लाख,एक मोबाईल,असा एकूण 12 लाख,76 हजार,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त मालाची पडताळणी केली असता दारू डुप्लीकेट असल्याचे निष्पन्न झाले.सदर प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले, यांच्या नेतृत्वात सपोनि.रमेश हत्तीगोटे,पोअं.वंदीराम पाल, अतूल तोडास,तिरुपती गोडसेलवार,प्रशांत नैताम सर्व पोस्टे.गोंडपिपरी यांनी केली आहे.
#Police action against illegal liquor transportation.#Chandrapur District Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$

