Crime : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड!|Marathi News.

News@Gambling...

             Chandrapur : जिल्ह्यातील ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पिंपळगाव(भोसले),येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकली तेव्हा काही इसम 52 ताश पत्त्यांवर पैशाची बाजी लाऊन हार-जीतचा जुगार खेळताना दिसून आले.दरम्यान पोलिसांना पाहून पडून जात असतांना राहूल वैरागडे वयवर्ष 40 रा.ब्रह्मपुरी,संतोष शेलोटे वयवर्ष 48 रा.पिंपळगाव,अरविंद भानारकर वयवर्ष 44 रा.ब्रह्मपुरी,अशोक ढोरे वयवर्ष 45 रा.नवरगाव, लोकमान डोंगे वयवर्ष 49 वर्ष रा.नवरगाव,एकनाथ चंडीकार वयवर्ष 40 रा.नवरा,या 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर राहुल अलोने रा.भालेश्वर,नितीन जराते रा.नवरगाव,धर्मेंद्र उर्फ धम्मा कराडे नवरगाव आणि मयूर निमजे रा.नवरगाव,हे 4 आरोपी फरार झाले आहेत.

      सदर आरोपींच्या अंगझडतीत मिळालेली नगदी रक्कम 25 हजार 900,दोन मोटार सायकल किं.अंदाजे 1लाख,30 हजार,52 ताश पत्त्यांची गड्डी किं.50,वापरलेली चटई किं. 500,असा एकूण 1 लाख,56 हजार,650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे सबंधीत कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूर व ब्राह्मपूरी पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे.

#Chandrapur District Crime News.

                       $$$$$$$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-