Crime : अवैधरित्या जनावरांच्या वाहतुकीवर LCB ची कारवाई!| Marathi News.

News@Crime...

Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने 15 आक्टोंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीवरून नागपूर जाणाऱ्या जनावरे भरलेल्या ट्रकला थांबवून पाहणी केली तेव्हा त्यामध्ये 2 म्हैस व 14 रेडे,असे एकूण 16 जनावरे दिसून आले.त्यांना ताब्यात घेऊन 4 आरोपींविरुद्ध नागभीड पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फिरज समीर खान वयवर्ष 26,आजाद रविदाद खान वयवर्ष 19 दोन्ही रा.भीमगड कॉलनी तालुका छपरा जिल्हा शिवनी(MP),सुनील चंद्रकुमार जेलेशिया वयवर्ष 21 रा. बोटाटोला तालुका धुलीया जिल्हा राजनांदगाव आणि जमीर कुरेशी रा.नागपूर,अशी आरोपींची नावे असून एक आरोपी फरार आहे.यांच्याकडून 16 नग म्हैस व रेडे किं. अंदाजे 6 लाख,40 हजार,ट्रक क्रं.MH/40/CT/2954,किं. अंदाजे 20 लाख,असा एकूण 26 लाख,40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ट्रकमधील जनावरांना चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन येथे जमा करण्यात आले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनील गौरकार,पोहवा. सुभाष गोहोकार,पोहवा.सतिश अवथरे,पोहवा.रजनीकांत पुठ्ठावार,पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.इमरान खान,पोअं. किशोर वाकाटे,पोअं.हिरालाल गुप्ता,पोअं.शशांक बदामवार,चापोअं.रुषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर,यांनी केली आहे.

#Crime News.#Action By Local Crime Branch Chandrapur.

                     $$$$$$$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-