Chandrapur : शहर पोलीस स्टेशन येथे 20 जानेवारी रोजी विनोद मधूकर अनंतवार रा.बागला चौक महाकाली वार्ड चंद्रपूर,यांनी तक्रार दिली की, “ते 14 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वा.घराच्या दाराला कुलूप लावून बाहेर फिरायल गेले व रात्री जवळपास 10 च्या सुमारास परत आले तेव्हां,दाराचे कुलूप तुटून दिसले.आत जाऊन पाहिले असता कपाटातील एकूण 35 ग्रॅम सोन्याचे दागीने कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री झाली.” अशा तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.आरोपीचा शोध घेऊन काही तासातच त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीलेली 1 सोन्याची चैन,1 जोड सोन्याचे कानातील लटकन,सोन्याचे डोरले (मणीसह),असा एकूण 1 लाख,77 हजार 399 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला होता.
दरम्यान न्यायालयीन प्रकियेअंती 10 आक्टोंबर रोजी विद्यमान कोर्टातून सुपूर्दनामा ऑर्डर मिळाल्यानंतर मुळमालकाला पोलिसांनी दागिने परत केले.आजघडीला सोन्याचे दर लक्षात घेता चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे संबंधीत तक्रारदाराच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.याच बरोबर कर्तव्य पुर्वीचा पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आला.पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले,यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके,यांच्या नेतृत्वात मपोहवा.निता भगत व पोअं.शिवाजी गोरे यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime Riport.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@

