Cattle Smuggling : गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई!|Marathi News.

News@Cattle Smuggling...

                Chandrapur : जिल्ह्यातील घुग्घुस पोलिसांना 14 आक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की,पिपरी धानोरा मार्गे गडचांदूर येथे एका पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत आहे.अशा माहितीवरून घुग्घुस पोलिसांनी पंचासह धानोरा पुलिया येथे नाकाबंदी करून सदर पिकअप वाहन थांबवून पाहणी केली असता तेव्हा त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त 13 गायी आखूड दोरखंडाने बांधून दिसून आले.सदर जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.

  यावरून पोलिसांनी शेख रियाज अहमद हुसेन वयवर्ष 34, शेख फिरोजुदीन शेख फहमुद्दीन वयवर्ष 26 आणि  आशिष गुलाब पाटील वयवर्ष 29,सर्व रा.बल्लारपूर यांना ताब्यात घेवून तिघांविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर आरोपीकडून एक पिकअप वाहन क्रं.MH/49/AT/ 0360,एक मोबाईल व 13 गोवंश जनावरे,असा एकूण 5 लाख,60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले,यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत,यांच्या नेतृत्वात सपोनि.सचिन तायवाडे,पोउपनि.गणेश अनभुले, सहाफौ.विनोद लोखंडे,पोहवा.अनिल बैठा,पोअं.सचिन वासाडे,मपोहवा.प्रणाली जांभूळकर यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.#Cattle Smuggling.

                                  $$$$$$$$$$$$$$$

-:Advertisement:-