Chandrapur : जिल्ह्यातील कोरपना येथे 9 आक्टोबर रोजी आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती तसेच सर्व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.बसस्थानकापासून सुरू झालेल्या मोर्चात राजुरा,जिवती,कोरपना तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला.शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.येथे झालेल्या सभेत निळकंठ कोरांगे,बंडू गेडाम, डॉ.येरमे,प्रमोद बोरीकर,भारत आत्राम,गजानन जुमनाके यांच्यासह इतर आदिवासी नेत्यांनी उपस्थिती समाज बांधवांना मार्गदर्शन केले व शासनाविरोधात संताप व्यक्त केला.
सभेला संबोधित करताना नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,महाराष्ट्र शासनाने घेतलेले काही निर्णय आदिवासी समाजाच्या हक्कांवर घाला घालणारे आहे. शासनाने बंजारा व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये,आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देणे आणि गौण खनिज संपत्तीवरील अधिकार काढून घेण्याचा निर्णय रद्द करावा,शासनाने 12 जुलै 2024 च्या शासन परिपत्रक रद्द करून 12 एप्रिल 2010 चे परिपत्रक कायम ठेवावे,रुपापेठ येथील आश्रम शाळेला केंद्रीय एकलव्य विद्यालयाचा दर्जा देऊन 1 ते 12 वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था करावी,पैसा अनुसूचित क्षेत्रात सेवानिवृत्त शिक्षकांना न घेता,पात्र उमेदवारांना शिक्षकपदी नियुक्ती द्यावी,50 टक्क्यांहून अधिक आदिवासी वस्ती असलेल्या गाव,वाडी,गुडे,वस्तींना 'पेसा' क्षेत्रात समाविष्ट करावे.अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मोर्चा शांततेत पार पडला असून,सर्व मागण्यांचे निवेदन कोरपना तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांना पाठवण्यात आले आहेत.या मोर्चेने प्रशासनाचे लक्ष वेधले असून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी निघालेल्या हा मोर्चा ऐतिहासिक ठरला.यामध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपूर्ण मोर्चा डॉ.प्रवीण येरमे,यांच्या नेतृत्वात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
#Tribal Reservation.#Tribal Reservation Rescue Action Committee.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

