Korpana : गडचांदूर-भोयगाव मार्गावरील लखमापूर गावाजवळ एका भरधाव ट्रकने प्रथम समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर ट्रकने चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका डिझायर कारलाही मागून धडक दिल्याने कार रस्त्याखाली उतरली.हा अपघात 10 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 5.30 च्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार,लखमापूर येथील गणेश थिपे(वय 45) हे आपल्या दुचाकीने लखमापूर येथून गडचांदूरकडे जात होते. दरम्यान,भोयगाव मार्गे चंद्रपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH/34/BZ/4227ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रकने डिझायर कार क्रमांक MH/34/AM/5537ला मागून धडक देत काही अंतरापर्यंत फरफटत नेले.या कारमधून नितीन राऊत (संचालक,गुरुदत्त ट्रान्सपोर्ट)हे गडचांदूरहून चंद्रपूरकडे जात होते. ट्रकच्या धडकेमुळे कार रस्त्याखाली उतरली,तर ट्रक रस्त्या लगतच्या खोलगट भागात जाऊन अडकला.अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळारून पसार झाला.घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून,गडचांदूर पोलीस या अपघात प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
#Terrible accident in Gadchandur.

