Korpana : तालुक्यात सध्या वाळू तस्करीचा मुद्दा ऐरणीवर असून काही वाळू माफिया बेदरकारपणे वाळूचा उपसा करून शासन संपत्तीची सर्रासपणे लूट करीत असल्याचे चित्र आहे.सोनुर्ली, सांगोडा,वनोजा,झोटींग आणि भोयगाव भैरंम,या घाटांवर सध्या अंतरगाव,नारंडा,वनोजा,सांगोडा,भोयगाव येथील काही वाळू माफियांनी मोठ्याप्रमाणात धुमाकूळ घातला असून रात्री जवळपास 12 ते पहाटेपर्यंत हजारो ब्रास वाळूचा उपसा करून नेली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वाळू तस्करी संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्याने कारवाई म्हणून येथील काही घाटांवर नाली खोदण्यात आली होती.अल्पशा विरामानंतर पुन्हा त्या नाल्या बुजवून वाळू उपसा करून ट्रॅक्टरव्दारे नेली जात आहे.हे चित्र नागरीक उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.आश्चर्य एकच की,तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांना का दिसत नाही!या वाळू चोरीमुळे निष्पाप लोकांचे बळी जात असून प्रशासन होत असलेल्या वाळू तस्करीकडे लक्ष देणार का ?


या सर्व घाटांवर वाळू माफियांचा 'रात्रीचा खेळ चाले' म्हणीप्रमाणे बिनधास्तपणे वाळूची चोरी केली जात असताना संबंधित तलाठी मंडळ अधिकारी नेमके आहे तरी कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रेती घाटांवर विना नंबरचे ट्रॅक्टर-ट्रालीचा वापर खुलेआम केला जात असल्याचे कळते. मैत्रीपूर्ण संबंधांमुळे जाणुनबुजून सर्वांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत.कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांना अच्छे दिन आल्याचे चित्र असून यांच्याकडून होत असलेल्या नियमबाह्य कृत्यमुळे एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तर दुसरीकडे शासन संपत्तीची लूट केली जात आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी,यांनी याकडे लक्ष देऊन याठिकाणी सुरू असलेल्या वाळू तस्करीवर अंकुश लावण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
#Sand Smuggling is a Big Problem in Korpana Taluka.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
