Gadchandur : भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांची 135 वी जयंती 14 एप्रील रोजी इतर ठिकाणांसह कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथेही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गडचांदूर संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीने 14 एप्रील रोजी सकाळी धम्म ध्वजारोहण व अभिवादन आणि सायंकाळी स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भव्य अशी धम्म रॅली काढण्यात आली.आकर्षक रोषणाई व डिजेच्या नादात वाजतगाजत शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत सदर रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या पुतळ्याजवळ झाला. 'मै भीम का दिवाना हुं,तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं,' डिजेवर वाजत असलेल्या अशा प्रकारच्या विविध गीतांवर तरूणाईचे नृत्य,प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते. 'जय भीम' च्या गगनभेदी जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमला होता. महामानवाला वंदन करण्यासाठी गडचांदूरात जनसागर उसळला होता.दरम्यान राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहर भाजपच्या वतीने संयुक्त जयंती समारोह समितीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी, माजी नगरसेवक राहूल उमरे,नगरसेविका अश्विनी कांबळे व इतर मान्यवरांना शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अरविंद डोहे,सतीश उपलेंचवार,सतीश बेतावर,हरीश घोरे,महेश घरोटे,शंकर अपूरकर,विकी उरकुडे,मोहन भारती,समाधान पवार, शाकीर भाई,सोमेश्वर सोनकांबळे,सतीश खोब्रागडे,रमेश चुदरी, जयंता भोंगळे,सौरभ इखारे,सचिन माली,धवल घोरे,विकी घोरे, राहुल चुरे,सचिन चुरे,हिमांशू नामवाड,सुरेश मेश्राम,सुरज पांडे, विश्वंभर झाम,योगेश बांदुरकर,विनोद बट्टलवार,गणेश आदे, राकेश अरोरा,विनोद इंगळे,गणपत बुराटकार,विवेक भेंडोलकर, सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.स्मिता चिताळे,सौ.शितल धोटे,सौ. अपर्णा उपलेंचवार,सौ.सपना सेलूकर,सौ.कीर्ती वैरागडे,सौ.उमा कंठाळे,सौ.पौर्णिमा आवळे,सौ.शालिका बेले,सौ.सिंधू कापसे,सौ. प्रीती सतपाडी,सौ.रंजना मडावी,सौ.संगीता गौत्रे,सौ.त्रिवेना जागताप,सौ.सारिका पिंपळकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.एकुणच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या हर्षोल्लास व थाटामाटात शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
#Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration 2026...
----------//----------
