Action Against illegal Transportation of Cattle : गोवंश जनावरांच्या तस्करीवर मोठी कारवाई! Marathi News.

News@Crime...

Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)घ्या पथकाने 14 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोस्टे धाबा हद्दीत नाकाबंदी करून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणारे 2 पिकअप वाहन पकडून पाहणी केली असता,सदर वाहनात एकूण 26 नग जनावरे(बैल,गाय,गोरे)अमानुषपणे भरून कत्तलीसाठी नेत असतांना मिळून आले.यावरून आरोपी विश्वास प्रकाश मांडवगडे वयवर्ष 22 रा.इंदिरा नगर गोंडपिपरी,क्रिष्णा उर्फ चिरकुट रा.बेंबाळ ता.मुल,रवि तोराम रा.लक्कडकोट ता.राजुरा श्याम मडावी रा.लक्कडकोट ता.राजुरा,समीर खान रा.राजुरा,व आणि अज्जु शेख रा.कागजनगर(तेलंगणा),यांच्याविरुद्ध धाबा पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यात एकूण 26 नग गोवंशीय जनावरे,2 पिकअप वाहन,1 मोबाईल असा एकूण किं.अं.19 लाख,30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कॉक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकार,सपोनि.धर्मेंद्र मडावी,उप पोस्टे धाबा व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अंमलदारांनी केली आहे.

#Action against illegal transportation of cattle.#Chandrapur District Crime news.

                                 $$$$$$$$$$$$$$$$$$$$$