Women Suicide Case : विष प्राशन करून गर्भवती महिलेची आत्महत्या!| Marathi News.

News@Suicide...

Chandrapur : जिल्ह्यातील चिमूर तालुका येथील कवडशी देश येथील सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 24 सप्टेंबर बुधवार रोजी उघडकीस आली आहे. प्रणाली राकेश गरमडे वयवर्ष 23,असे मृतक महिलेचे नाव आहे.राकेश गरमडे आणि प्रणाली,या दोघांनी कुटुंबांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला होता.विवाहानंतर दोघेही गावातच कुटुंबापासून वेगळे राहत होते.प्रणाली सात महिन्यांची गर्भवती होती.घटनेच्या दिवशी सकाळी अंदाजे 8 च्या सुमारास पती राकेश,हा घरीच झोपलेला असताना प्रणालीने कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

दरम्यान,अस्वस्थ वाटू लागल्याने तिने पतीला उठवून सदर प्रकार सांगितला.त्याने लगेच ग्रामस्थांच्या सहकार्याने नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,तीचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन शवविच्छेदन केले.त्यानंतर, मृतदेह स्वाधीन करण्यात आला.कवडशी देश येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात प्रणालीच्या कुटुंबीयांनी कोणतीही हरकत घेतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मात्र,आत्महत्येचे कारण काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर प्रकरणी पुढील तपास शंकरपूर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक रवी वाघ,दुर्गेश नन्नावरे,सुनील घोडमारे,सुरज गुरनुले आदी करीत आहेत.

#Women Suicide Case. #Shocking Incident. #Chandrapur District News.

            @@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-