Chandrapur : Sindewahi :- सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असललेल्या मोहाळी गावात मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना 19 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी उघडकीस आली.सदर घटनेमूळे परिसरात खळबळ उडाली आहे.राजू आनंद सिडाम वयवर्ष 35 रा.मोहाळी,असे मृतकाचे नाव असून,हा घरी एकटा असतांना मध्यरात्री त्याचा गळा चिरून अज्ञात इसमाने हत्या केल्याने तो रक्ताच्या थारोड्यात पडला होता. घटनेची माहिती सिंदेवाही पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्याची हत्या कुणी केली हे अजूनही गुलदस्त्यातच असून मृतक हा गावात दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता.मृतक राजू आणि त्याची पत्नी पुनम वयवर्ष 30,मुलगा मेहरदीप वयवर्ष 8,व मुलगी वैष्णवी वयवर्ष 6,हे मजुरीचे काम करण्यासाठी वरोरा येथे किरायाने वास्तव्यास होते.पण,राजूला दारु पिण्याची सवय असल्याने घरमालक त्याला फार काळ घरात ठेवायचे नाही.
त्यामुळे पत्नीला तिथेचे ठेवून हा स्वगावी मोहाळी येथे परत आला होता.पत्नी पुनम,ही वरोरा येथील एका पेट्रोल पंपावर कामाला जायची.मुलांचे शिक्षण वरोरा येथील एका शाळेत सुरू आहे.अलीकडेच मृतकाने गावी येवून अवैध दारु विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.मृतकाच्या घरात शिजलेले अन्न आढळून आले होते.किचनपासून ते बेडरूम पर्यंत मृतकाला ओढत नेल्याने रक्ताचे लोट वाळलेल्या स्थितीत होते.त्याचा गळा कापल्यामुळे बेडरुममध्ये रक्ताचा सडा पडला होता.सदर हत्या कुणी आणि कशामुळे केली? याचा तपास सुरू आहेत.
#Murder Case. #Chandrapur District Crime News. #illegal liquor.
@@@@@@@@@@@@@@@