Gadchandur : राजुरा-गोविंदपूर हायवेवर अपघाताची मालिका सुरू असताना 23 सप्टेंबर रोजी पुन्हा एक भीषण अपघात घडला.कोरपनावरून गडचांदूरकडे येताना एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारचा लालगुडा फाट्यावर अपघात झाला.सदर कार लालगुडा फाट्यावरील वळणावर पलटी खात चक्क रस्त्याच्या कडेला उभी एका स्कॉर्पिओ गाडीवर जाऊन आदळली.या भीषण अपघातामध्ये कार मधील एका तरूणीचा मृत्यू झाला तर दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत.कार चालकाच्या बाजुच्या सीटवर बसलेली वैशाली शामराव कोयचाडे वयवर्ष 25 रा.शिवणी ता.वणी जि.यवतमाळ,याचा मृत झाला तर चालक प्रेम कोवे वयवर्ष 22 रा.मानोरा ता.भद्रावती जि.चंद्रपूर आणि मागच्या सिटवर बसलेला करण सुनील पंधरे वयवर्ष 17 रा. आवाळपूर ता.कोरपना जि.चंद्रपूर,हे दोघे गंभीर झाले आहे. यांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार,घनश्याम देवराव जुनघरे वयवर्ष 41 रा.लखमापूर(हल्ली मुक्काम मरार महोल्ला वार्ड क्रं.2 ता. कोरपना),यांनी 22 सप्टेंबर रोजी महेन्द्रा स्कॉर्पिओ क्रं.MH /04/FR/8746 गाडी घेतली.पुजा करण्यासाठी घनश्याम परिवारासोबत लालगुडा फाट्यावरील हनुमान मंदिरात गेले होते.त्यांनी आपली स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला उभी केली असता सायंकाळी जवळपास 5,30 च्या दरम्यान कोरपनाच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर कार क्रं.MH/40/BJ/7339,घनश्याम यांच्या स्कॉर्पिओवर पाठीमागून आदळली.चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात असून ज्यामध्ये एका निष्पाप तरूणीचा मृत्यू झाला तर दोघे तरूण गंभीर जखमी झाले आहेत.राजुरा जवळील कापणगाव येथील हायवेवरील घटना ताजी असतानाच आता ही घटना घडल्याने हायवेवर उभ्या वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
'नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया.'
वाहतुक पोलिसांच्या वारंवार कारवाई नंतरही मुजोर ट्रान्सपोर्टर आपापले मोठमोठे वाहन बेदरकारपणे थेट रस्त्याच्या कडेलाच दुतर्फा उभे करतात.इतर ठिकाणचे अपवाद वगळता अंबुजा फाटापासून गडचांदूरपर्यंतच्या विविध पेट्रोल पंप,पंक्चरची दुकाने आणि रेल्वे फाटक जवळील गॅराज समोर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात.यामुळे राहदारीला अडथळा निर्माण होत असून जीव मुठीत घेऊन ये-जा करवे लागत आहे.काहींनी तर चक्क दुकानासमोर हायवेची जागाच विकत घेतल्यासारखे बिनधास्तपणे रस्त्यावरच बस्तान मांडल्याचे दिसून येत आहे.यांची मक्तेदारी मोडीत काढण्याची गरज आहे.अन्यथा भविष्यात या सर्व ठिकाणी मोठी दुर्घटना होण्यास कोणीही थांबू शकणार नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया देत ठाणेदारांनी याकडे जातीने लक्ष देऊन यांचा कायमचा बंदोबस्त करावा,सर्व वाहने हटवून हायवेवरील अडथळा दूर करावा अशी मागणी वजा विनंती काही सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे.आता ठाणेदार यावर काय भुमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Shocking Incident.
#Rajura-Govindpur Highway Car Accident.
@@@@@@@@@@@@@@@@