Korpana : गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या थुटरा,येथे दुचाकीवरून अवैध दारू विक्रीसाठी आणत असताना 20 सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे 10 च्या सुमारास थुटरा येथील महिलांनी एका दारू विक्रेत्याला पकडून त्याच्या ताब्यात असलेल्या पिशवीची पाहणी केली तेव्हा,त्यामध्ये एकूण 50 देशी दारूचे पव्वे मिळून आले. महिलांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली असता पोलीस सदर ठिकाणी पोहोचले.महिलांनी त्या दारू विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सुवर्णा कुररावार,सुनंदा कुररावार,उज्वला बोढे,ग्रा.पं. सदस्य माया अन्नाके,जोसना डांगे,छाया शेंडे,सुनीता मुन, सुघदा तंगळपल्लीवार,शशिकला धुर्वे,वंदना दर्वी,ममता ऐसेकर,संगीता चुनारकर,इंदुबाई देठे,योगीता जिल्हवार, आशा बावणे यांची यावेळी उपस्थिती होती.
#Illelgal Liquor.
@@@@@@@@@@@@@@@