Gadchandur : पासून अवघ्या 4 कि.मी.अंतरावर असलेल्या हरदोना(खु)या गावातील हनुमान मंदिरावर वीज पडल्याची धक्कादायक घटना 11 सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली.माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराजवळ गर्दी केली होती.सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.दुपारी 2 च्या दरम्यान अचानकपणे वीजेच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली.इतक्यात एक वीज गावातील जवळपास 51 फुट महाकाय हनुमान मंदिराच्या कळसावर पडली.
यामुळे कळसाचे नुकसान झाले.विद्यृत तारे जळाली, मंदिराला जबरदस्त हादरा बसल्याने मंदिरावरच्या बाजूला चौफेर कोरीव मूर्ती,त्यातील एक मुर्ती खाली कोसळली व बाकी बरेचश्या मुर्त्याचे नुकसान झाले तर कळसाला भेगा पडल्या आहेत.मंदिराचे अजून काय नुकसान झाले हे वरती चढून पाहणी केल्यानंतरच समोर येईल.अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.हीच वीज जर गावात इतर ठिकाणी पडली असती तर,मोठा अनर्थ घडला असता. 'गावावर येणारे संकट,देवाने आपल्यावर घेतले' अशी चर्चा गावकरी यावेळी करतांना दिसून आले.तंटामुक्ती अध्यक्ष महादेव वाटेकर,माजी उपसरपंच किसन टेकाम,वासुदेव झाडे,मंदिराचे पुजारी सुरेश परसुटकर यांच्यासह ग्रामवासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#Shocking Incident. #Lightning Strikes at temple in Harduna Village.
@@@@@@@@@@@@@@@