VYASAN MUKTI : विद्यार्थ्यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश!|Marathi News.

News@Addiction Recovery...

Gadchandur : येथील 'ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल'द्वारे 1 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी शाळा व गडचांदुरातील मुख्य चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,येथे पथनाट्याचे अप्रतिम सादरीकरण करून तंबाखू,बिडी,सिगारेट,दारू,या विषयांवर जनजागृती करत  “नशा करना है खराब,मिलकर करो इसका बहिष्कार” अशाप्रकारे समाजात व्यसन मुक्तीचा संदेश दिला.प्रेक्षक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून याचा लाभ घेतला.       दरम्यान शाळेत आयोजित पालक सभा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष जगदीश ठावरी व प्रमुख पाहुणे म्हणून विकास अवघडे साहेब तसेच प्राचार्या निर्मला ठावरी व इतर मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी भाषणातून विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेमुळे संसार कसे उध्वस्त होतात,यासंदर्भात माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्पधेत भाग घेऊन यशस्वी व्हावे,असे मोलाचे मार्गदर्शन केले.       विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून पालक सभा व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील बहुसंख्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपली कला प्रदर्शित केली.यामध्ये कार्तिक चावके,आर्यन मायकलवार,तौकीर शेख,आयुष रागीट,आरोही गणवीर, ओंकार मुंडे,श्लोक बावणे,या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी उत्कृष्ट स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन वैशाली इंदोरकर,प्रास्ताविक निर्मला ठावरी तर आभार प्रियंका भंडारवार,यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमलता येरणे,गजानन राम, पिंकू धुळे,रसिका तोडे,अनुपमा पांडे,उषा बावणे,मुस्कान शेख,नाजुका वैद्य व शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी पालकांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

#Addiction Recovery. #A Message of Freedom from A inddiction.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-