Political Explosion : कवठाळा येथे भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न!|Marathi News.

News@पक्षप्रवेश...

Gadchandur : राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे,यांची कार्यशैली,कोणतेही भेदभाव न करता 'सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती,हे पाहून विविध पक्षाचे नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहेत.संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दररोज कुठे न कुठे शेकडोंच्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे. सततच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढताना पाहून विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहेत.याच श्रेणीत 24 ऑगस्ट रोजी कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे भाजपचा भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.याध्ये पालगावचे सरपंच अरुण रागीट आणि कवठाळाच्या सरपंचा सौ.रुपाली बोबडे,यांच्या नेतृत्वात आ.देवरावदादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाखर्डी,कवठाळा, पालगाव,कोराडी येथील विविध पक्षाच्या शेकडो महिला, पुरूष वृद्ध,तरूण,कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाजपात प्रवेश घेतला.आ.भोंगळे यांनी सर्वांना पक्षाचे दुपट्टे घालून पक्षात स्वागत केले.यावेळी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.वृद्धांपासून तर तरुणांपर्यंत पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रांगच रांग पहायला मिळाली.आ.देवरावदादा भोंगळे यांच्या आगमनानंतर 4 जेसीबी वरून पुष्प वर्षाव करण्यात आला.तसेच पुष्पगुच्छ देऊन आ.भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान डिजे व ढोलताशांच्या गजरात,वाजतगाजत गावाच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सांगता नियोजित सभेच्या ठिकाणी झाली.याठिकाणी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमादरम्यान पालगावचे सरपंच अरूण रागीट व त्यांच्या पत्नी तसेच कवठाळाच्या सरपंचा रुपाली बोबडे व त्यांचे पती आणि पवनदिप यादव,यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला.आ.भोंगळे,यांनी पक्षाचे दुपट्टे घालून मोठ्या सन्मानाने पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले. यावेळी 'देवरावदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है,एकच वादा देवरावदादा'च्या घोषणांनी सभागृह दुमदुमूले होते. सदर भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.                                   'दादा म्हणाले.'

“सबका साथ,सबका विकास,सबका सन्मान,याप्रमाणे पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल,कोणत्याही जनहिताच्या कामात,काही अडचण येत असेल तर,अर्ध्या रात्री संपर्क करावा,भाजप पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” अशी विश्वासात्मक ग्वाही आमदार देवरावदादा भोंगळे यांनी यावेळी दिली.मी जनतेला सांगितलो होतो,मी आमदार झालो तर,माझ्या मतदार संघाच्या प्रत्येक माणसाला वाटला पाहिजे,मी आमदार आहो.हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करायचं आहे. असे आपुलकीचे मत यावेळी दादांनी व्यक्त केले.ऐवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग पाहून 'त्यांना' धडकी भरली...? असा मिश्किल टोलाही आ.भोंगळे यांनी लगावला.

#Bharatiya Janata Party. #Political Explosion. #MLA Devraodada Bhongle.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-