Snake Bite Death : विषारी सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यु.

News@Shocking...

       Chandrapur : चिमूर तालुक्यातील भिसी येथील ओम नंदकिशोर येरूणकर वयवर्ष 18,हा तरुण नागपूरला 12 वी मध्ये शिक्षण घेत होता.याला एका विषारी सर्पाने दंश केल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा नागपूर येथे मृत्यु झाल्याची घटना शनिवार रोजी घडली.प्राप्त माहीतीनुसार सदर तरूण आपल्या आई-वडील व मोठ्या भाऊ सोबत नागपूरला खापरी परिसरात राहत होता.मागील 5,6 दिवसांपुर्वी नागपूर येथे रात्रीच्या सुमारास झोपेत सर्पदंश झाला.परंतू,साप दिसून न आल्याने उंदिर चावला असावा, असा गैरसमज झाल्याने त्याच्यावर तात्काळ उपचार होऊ शकले नाही.

 अशातच दुसऱ्या दिवशी सर्पदंशाचे लक्षणे दिसून आल्याने त्याला नागपूर येथील दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले व तिथे उपचार सुरू असतांना शनिवार रोजी त्याची प्राणज्योत मावळली.मृतक ओमच्या प्रेतावर भिसी येथे रविवार रोजी अंतिम संस्कार करण्यात आले.सदर घटनेने परिवारावर दुःखांचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृतक ओमच्या पश्चात आई,वडील भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.

#Shocking News.

#Death by snake Bite.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-