Gadchiroli : आष्टी ते मुलचेरा रोडवरील दुचाकीच्या अपघातात 1 ठार तर 2 तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. लवकुश गोरडवार वयवर्ष 31 रा.घोसरी(नांदगाव),असे मृतकाचे नाव असून अक्षय वाकुडकर वयवर्ष 27 रा. नांदगाव(घोसरी),शुभम वाकुडकर वयवर्ष 30 रा.गोडाळा ता.मुल जि.चंद्रपूर,हे दोन्ही गंभीर असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार,3 तरूण मुलचेराकडून आष्टीकडे येत असतांना दुचाकी क्रं.MH/34/BW/4909,वरील ताबा सुटल्याने अपघात झाला.सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी पोहोचले.पंचनामा करून मृतदेह व जखमींना उपचारासाठी आष्टीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.घटनेची अधीक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत.
#Ashti Bike Accident.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@