Truck Auto Accident : भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले,भीषण अपघात!|Marathi News.

News@भीषण अपघात....

          Gadchandur : राजुरा शहरापासून अवघ्या 5 किमी. अंतरावर असलेल्या 'कापणगाव' जवळ आज दि.28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास मृत्यूचा थरार बघायला मिळाला.GRIL कंपनीच्या हायवा ट्रकने प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटो चालकासह 6 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी असल्याचे कळते.प्राप्त माहितीनुसार राजुराकडून पाचगावकडे प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटोला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या RJ/ 14/GQ/9221,या क्रमांकाच्या हायवा ट्रकने जोरदार धडक दिली.यामध्ये प्रवासी ऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून जखमी पैकी एकाला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून सर्व जखमींना रुग्णालयात पाठवले.ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात राजुराचे ठाणेदार सुमित परतेकी,यांच्या नेतृत्वात सपोनि.हेमंत पवार व सहकारी पुढील तपास करीत आहे.दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.हायवेचे काम करणाऱ्या कंपनी व अधिकाऱ्यांवर सुद्ध गुन्हा दाखल करावा,अशी मागणी उपस्थित संतप्त नागरिकांनी यावेळी केली.लोकांचा आक्रोश पाहून दंगा नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.एकाच वेळी 6 जण दगावल्याने जनतेत आक्रोश दिसत असून राजुरा शहरात तणावपूर्ण शांतता दिसत आहे.

          'भविष्यात येथेही अपघाताची दाट शक्यता?' 

                 सध्या राजुरा-गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.महाराष्ट्र ते तेलंगणा राज्याला जोडणारा हा मार्ग असून GRIL नामक कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे.या कंपनीची अवजड वाहने नेहमीच ओव्हर लोड आणि भरधाव वेगाने माती-दगड व इतर साहित्य नेत असतात.या मार्गावरील बऱ्याच गावात ये-जा करण्यासाठी व्यवस्थितरित्या रस्ता काढून देण्यात आला आहे.मात्र,अंबुजा फाटा जवळील लहानमोठ्या हरदोना गावाला रस्ता सोडण्यात आला नाही.गडचांदूर वरून येताना गाव ओलांडून सरळ अंबुजा फाटा जाऊन परत गावाकडे यावे लागते.गावकऱ्यांना गावात जाण्यासाठी रस्ता सोडण्यात न आल्याने दुसऱ्या बाजुला शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना 4 ते 5 किमीचा फेरा घेऊन शेतात जावे लागत आहे.

          लहानमोठ्या वाहन चालकांना सुद्धा याच अडचणीचा सामना करावा लागत असल्याने,अखेर नाईलाजास्तव जीवमुठीत घेऊन शेतकरी डिवायडर वरून बैलबंड्या घेऊन शेतात ये-जा करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.या गावात जाण्यासाठी आताही रस्ता काढून देण्यात आला नाही तर भविष्यात याठिकाणी सुद्धा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे? यासंदर्भात हरदोना वासीयांनी गेल्या 8 महिन्यांपूर्वी हायवेच्या संबंधीतांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली होती.परंतू,आजतागायत काहीच समाधानकारक घडले नाही.राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांनी याकडे लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.याविषयी गाववासीयांकडून दादांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कळते. 

#Truck auto serious accident.

#Gadchandur-Rajura Road.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-