Gadchandur : हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे,शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,यांच्या शिवसेना पक्षावर विश्वास ठेवत गडचांदूर वार्ड क्रं.6,येथील सामाजिक कार्यकर्ते 'अरविंद गोरे' यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 14 ऑगस्ट रोजी हॉटेल सेंट्रल पॉईंट नागपूर,येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत,यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या पुर्व विदर्भ पदाधिकारी,कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे,यांच्या नेतृत्वात गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल,शिवसेना सचिव संजय मोरे,भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने,पुर्व विदर्भ संघटक प्रमुख किरण पांडव,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख किशोर राय,चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडू हजारे,कोरपना तालुकाप्रमुख राकेश राठोड,गडचांदूर शहरप्रमुख विक्की राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने गोरे यांना मानणारा मोठा तरूण वर्ग आहेत. शहरात दांडगा जनसंपर्क असल्याने भविष्यात याचा पक्षवाढीसाठी तसेच आगामी नगर परिषद व इतर निवडणुकीत पक्षासह आणि महायुतीला मोठा पाठबळ मिळणार असून आता शिवसेनेत इन्कमिंगची मालिका सुरू झाली आहे.आगामी काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेना कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड यांनी 'कोरपना Live' ला दिली आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच पक्षवाढीसाठी इमानेइतबारे काम करणार असल्याचे मत अरविंद गोरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गोरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेशानंतर पुढे कोण? याकडे नजरा लागलेल्या आहेत.
#ShivSena News.
#Eknath Shindes Shiv Sena.
#Entry into Shiv Sena.
#Deputy Chief Minister Eknath Shinde.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@